वाहतूक पोलिसाला शिवीगाळ आणि धमकी; पुनावळेतील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ डिसेंबर २०२२) :- वाहतुक नियमन करीत असताना आरोपींनी फिर्यादी वाहतूक पोलिसाला “ ए कुत्र्या कुठला पोलीस आहेस; बाजुला हो, मला पुढे जावु दे ” असे अपशब्द वापरले. सरकारी कामात अडथळा आणुन मोठ-मोठयाने आरडाओरडा केला. फिर्यादी यांनी ” अरे मित्रा असे का बोलतोस ?” अशा सौम्य भाषेत आरोपींना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु, आरोपीने त्यांची दुचाकी (एम.एच १२ / यु.एक्स. २५४२) रस्त्यामध्ये आडवी उभी केली.
” तुला माहित नाही का ही हद्द हिंजवडी पोलीस स्टेशनची आहे. हिंजवडी पोलीसाला विचार तु, इथल्या पोलीसांना मी सरळ केलेले आहे. मी येरवडा जेलमध्ये जावुन आलो आहे. माझ्या नादी लागु नको ” अशी धमकी देत शिवीगाळ केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. १६) रोजी दुपारी ४.१० वा. च्या सुमारास पुनावळे अंडरपास, पुनावळे येथे घडली. फिर्यादी वाकड वाहतुक विभागाचे पो.हवा. यांनी आरोपी सचिन तानाजी राजपुत (वय २२ वर्षे रा. मु.पो. कासार अंबोली, ता. मुळशी), अरुण बलराम रास्ते (वय ३० वर्षे पत्ता माहीत नाही) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. रावेत पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.
















