न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी (दि. ७ मार्च) :- जागतिक महिला दिनानिमित्त फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन आणि पिंपरी चिंचवड शहर विकास आघाडीच्या वतीने शुक्रवार (दि. ८ मार्च) रोजी चिंचवड ऑटो क्लस्टर येथे सायंकाळी पाच ते आठ या वेळेत महिला उद्योजक मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी फोरमच्या माध्यमातून स्वतःचा व्यवसाय सुरू करणाऱ्या महिला उद्योजक व सामाजिक क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केलेल्या महिलांचा सन्मान सोहळा समारंभ होणार आहे. तसेच लकी ड्रॉद्वारे विजेत्या महिलांना पैठणी देण्यात येणार आहे
याप्रसंगी सिने अभिनेते विनायक भावे, महापौर राहुल जाधव, कल्पनाताई आढळराव पाटील, कॅप्टन तनुजा काबरे, पोलिस अधिकारी स्मार्तना पाटील, पंतप्रधान मुद्रा योजना संचालक वर्षा भोसले आणि बिझनेस पार्टनर लॅक्मे अकेडमीच्या सुमित कौल भोसले आदी उपस्थित राहणार आहेत, असे फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी सांगितले.











