न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ मार्च) :- काळाची गरज ओळखून विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच व्यवहारीक व व्यवसायिक शिक्षणाचे ज्ञान देण्यासाठी प्रत्यक्ष अनुभव देण्याचा प्रयत्न अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या भारतीय विद्यानिकेतन विद्यालयात करण्यात आला.
याअंतर्गत तिसरीतील विद्यार्थ्यांनी मेडीकल, किराणा मालाचे दुकान, दवाखाना, वकीलांचे कार्यालय आदी ठिकाणी भेट देऊन तेथील कामकाजाची माहिती करून घेतली. तसेच विद्यार्थ्यांना बॅंकेचे व्यवहार कसे असतात, हे सांगण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नेण्यात आले.
यामध्ये विद्यार्थ्यांना बॅंकेत खाते कसे सुरू करायचे, खात्यावर पैसे कसे जमा करायचे, खात्यातून पैसे कसे काढायचे, चेकबुक, आरटीजीएस, एनएफटी कसे करायचे हे सर्व बॅंकेतील व्यवहार समजावून सांगण्यात आले. वर्गशिक्षिका निलम मेमाणे यांनी विद्यार्थ्यांना या सर्व व्यवसायांची माहिती देत त्यातील बारकावे समजावून सांगितले.
संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, उपाध्यक्ष प्रणव राव, मुख्याध्यापिका गीता येरुणकर, हर्षा बाठिया, तेजल कोळसे पाटील, मधू दाणी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी या सर्व ठिकाणी भेट दिली.











