न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ मार्च) :- महाराष्ट्र खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या उपाध्यक्षपदी डॉ. हेमंत बाबासाहेब तापकीर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासदंर्भातील आदेश नुकताच जारी करण्यात आला आहे.
डॉ. हेमंत तापकीर यांनी बुधवार (दि. ६) रोजी मंडळाच्या मुख्य कार्यालयात मंडळाचे सभापती विशाल चोरडिया यांच्या उपस्थितीत पदभार ग्रहण केला. यावेळी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एम. एन. केरकेट्टा उपस्थित होते. डॉ. हेमंत तापकीर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदिच्छा दिल्या आहेत.

डॉ. हेमंत तापकीर हे उच्चशिक्षित असून, त्यांनी यापूर्वी केंद्रीय श्रमरोजगार मंत्रालयाच्या केंद्रीय सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी काम केले आहे. पदभार स्वीकारल्यानंतर तापकीर यांनी सांगितले की, मंडळाच्या शासनाकडे प्रलंबित असलेल्या विषयाबाबत आढावा घेऊन, विकासात्मक कामकाजाचे सर्व विषय शासनाच्या माध्यमांतून मार्गी लावण्यात येतील.











