न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी (दि. १६ मार्च) :- येथील सुश्रावक धनराजजी रूपचांदजी डुंगरवाल वय ८६ यांचे संलेखना (संथारा) व्रताची सांगता आज (दि. १६) रोजी झाली. त्यांची डोलीयात्रा त्यांच्या निवासस्थान शितालबाग येथून भव्य मिरवणूकीतून भोसरी स्मशानभूमी येथे संपन्न झाली.
या वेळी मोठया संख्याने भाविक व पिंपरी चिंचवड शहराचे जैन संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. उपप्रवरतींनी खानदेश भूषण साध्वी दिव्यज्योतिजी महाराज यांच्या मुखाविंदाने संलेखना व्रताचे सुरुवात १३ मार्च पासून झाली होती. शिरूर पंजारपोल गोमाताप्रेमी सेवक म्हणून यांचा आदराने उल्लेख जैन समाजात केला जातो.
त्यांच्या मागे विवाहित दोन मुले आणि एक मुलगी, सुना नातवंडे असा परिवार आहे. भोसरी भूषण सन्मानित अमृतशेठ डुंगरवाल, जैन श्रावक संघाचे खजिनदार सुभाषजी डुंगरवाल यांचे ते वडील होते तसेच जैन संघाचे संघपती सुभाषजी चुत्तर यांचे ते सासरे होते.











