- विविध नामांकित कंपन्यांच्या मनुष्यबळ व्यवस्थापकांची उपस्थिती
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. १६ मार्च) :- नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ पर्सोनेल मॅनजमेंट अर्थात एनआयपीएमचा वर्धापनदिन नुकताच शुक्रवारी (दि. १५) रोजी एनआयपीएमच्या पुणे विभागाच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थान गीत गायनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. एनआयपीएम पुणे विभागाचे सचिव नरेंद्र पाटील यांनी यावेळी आपल्या मनोगतात सर्व सदस्यांना शुभेच्छा देत मनुष्यबळ व्यवस्थापकांचे राष्ट्रीय पातळीवरील एक विश्वासार्ह संघटन म्हणून एनआयपीएमने आपला लौकिक कायम राखला आहे असे सांगितले.
तसेच यावेळी त्यांनी संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी यांनी पाठविलेला शुभेच्छा संदेश वाचून दाखविला. या संदेशात त्यांनी लवकरच संस्थेचे नवीन कार्यालय देशाच्या राजधानी असलेल्या दिल्ली शहरात सुरु होत असल्याचे सांगितले.
याप्रसंगी लेबर लेबर लॉ प्रॅक्टिशनर असोसिएशन, पुणेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ॲड. आदित्य जोशी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी मनुष्यबळ व्यवस्थापन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल शंकर साळुंखे, विश्वनाथ येरवा, प्रा. आशिष व्यास, डॉ. गिरीश बक्षी, डॉ. योगेश उपाध्याय, अजय कुलकर्णी व संजय सराफ यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच एनआयपीएमच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘स्टुना’ या राष्ट्रीय विद्यार्थी परिषदेचे यशस्वीरित्या आयोजन केल्याबद्दल डॉ. एस. व्ही भावे यांनाही स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच नुकतीच विश्वेश कुलकर्णी यांची एनआयपीएमच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सर्वाधिक मताधिक्याने विजयी होऊन निवड झाल्याबद्दल एनआयपीएम पुणे विभागाच्या वतीने विशेष स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आला. त्यांच्यावतीने हा सत्कार त्यांच्या पत्नी सौ. शोभा कुलकर्णी यांनी स्वीकारला. तसेच याप्रसंगी ‘स्टुना’ या राष्ट्रीय विद्यार्थी परिषदेच्यावेळी स्वयंसेवक म्हणून कामगिरी बजावलेल्या सुशील वारकर, पवन शर्मा, अमला करंदीकर, अमृता तेंडुलकर, मृगना कोटीभास्कर, प्रशांत कुलकर्णी, श्रीकांत तिकोने, कल्पेश पाटील, प्रथमेश पाटील, शाम वायचळ, संदीप मांडवकर व योगेश रांगणेकर यांना सन्मानित करण्यात आले.
वर्धापनदिनाच्या या कार्यक्रमात एनआयपीएम पुणे विभागाचे अध्यक्ष उमेश जोशी यांच्यासह रवींद्र चौधरी, मीनल कुलकर्णी, डी. बी. निंबाळकर, डॉ. राजेंद्र सबनीस, श्री.नागरेचा व अनेक सदस्य आपल्या कुटुंबियांसह मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित होते.
याप्रसंगी आयोजित संगीत रजनी कार्यक्रमातही उपस्थितांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. सूत्रसंचालन योगेश रांगणेकर यांनी, तर आभार प्रदर्शन हेमांगी धोकटे यांनी केले.











