न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ मार्च) :- पिंपरी-चिंचवड मधील सामाजिक कार्यकर्ते पोपट आरणे यांची राष्ट्रीय समाज पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र वाहतूक संघटकपदी नियुक्ती करण्यात आली.
महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस उज्ज्वला हाके यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली. पक्षाचे वाहतूक आघाडीचे अध्यक्ष विनायक रूपनवर यांनी आरणे यांना नियुक्ती पत्र दिले. यावेळी संपर्क प्रमुख धनंजय घोलप उपस्थित होते.











