न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ मार्च) :- टेम्पोत बसलेल्या मंजीत प्रसाद याने ‘क्या हो गया’ असे म्हणताच दुचाकीवरील एका आरोपीने मंजित याच्या तोंडावर हाताने मारहाण केली. थोबाडीत का मारली? याचा जाब विचारण्यासाठी मंजीत खाली उतरला. ‘क्यु मारा’ असे म्हणताच आरोपींनी मंजित याला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
ही घटना शुक्रवार (दि. १५) रोजी पिंपरीतील डिलक्स चौकात घडली. त्यानंतर मंजित याच्या दोन्ही खांद्यावर चॉपरने वार केले. गंभीर जखमी झालेल्या मंजित याच्यावर थेरगाव येथील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू असताना शुक्रवारी रात्री त्याचा मृत्यू झाला.
मंजीत मोतीलाल प्रसाद (वय २२, रा. काळेवाडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी धर्मेश शामकांत पाटील (रा. मिलिंदनगर, पिंपरी), यशवंत उर्फ अनिल लक्ष्मण गायकवाड (वय २०, रा. मिलिंदनगर, पिंपरी), स्वप्नील संजय कांबळे (वय २५, रा. आदर्शनगर) तिघांना अटक करण्यात आली आहे. पिंपरी ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गु्न्हे) रंगनाथ उंडे तपास करत आहेत.











