न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ मार्च) :- महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांची भारतीय कुस्ती महासंघाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पिंपरी-चिंचवड़ कुस्तीगीर संघाच्या वतीने विशेष सत्कार हनुमंत गावडे यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी संतोष माचुत्रे, काळुराम कवितके, राजेंद्र बालवडकर आदी उपस्थित होते.
यावेळी लांडगे म्हणाले, ”निवडीमुळे निश्चितच महाराष्ट्राच्या कुस्तीगिरांना फायदा होईल. आजवर कुस्ती क्षेत्रात काम करीत असताना महाराष्ट्रातील माझ्या सर्व सहकारी सदस्यांनी खूप मोलाची मदत व सहकार्य केले. मी प्रामाणिकपणे आणि सातत्य ठेवून केलेले काम यामुळे माझी निवड या पदावर झाली.”
यावेळी संघटनेची माहिती देताना गावडे म्हणाले, “भोसरी येथील आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती संकुल सध्या अंतिम टप्प्यात असून, लवकरच शहरातील कुस्तीगिरांना याचा फायदा होणार आहे. महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या दत्तक योजनेचा लाभ शहरातील कुस्तीगिरांना होत आहे. तसेच लवकरच महापौर चषक कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.











