न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० मार्च) :- दि इन्स्टीट्य़ुट ऑफ चार्टर्ड अकौंटंन्टस ऑफ इंडिया (आयसीएआय) वेस्टर्न रिजन तर्फे पिंपरी चिंचवड शाखेला लहान गटातील विद्यार्थी संघटनेस “द्वितीय बेस्ट ब्रॅंच- वेस्टर्न रिजन आयसीएआयचा पुरस्कार, हा मुंबई येथे प्रदान करण्यात आला. आयसीएआय च्या वतीने आयोजित केलेल्या वार्षिक कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
आयसीएआयचे राष्ट्रीय अध्यक्ष सीए. प्रफुल्ल छाजेड, राष्ट्रीय उपाध्यक्ष सीए. अतुलकुमार गुप्ता यांच्या हस्ते पश्चिम विभागीय अध्यक्षा सीए प्रीती सावला, पश्चिम विभागीय उपाध्यक्ष उमेश शर्मा, सचिव सीए.राकेश अलशी, खजिनदार सीए.यशवंत कासार, पश्चिम विभागीय तात्कालिक अध्यक्ष सीए.संदीप जैन, सीए. बालकिशन अगरवाल यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पिं.चिं. सीए शाखेचे तात्कालिक अध्यक्ष सीए आमोद भाटे, तात्कालिक उपाध्यक्ष आणि विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सीए युवराज तावरे, खजिनदार-सचिव सीए प्राजक्ता चिंचोलकर, माजी अध्यक्ष सीए सुहास गार्डी यांनी हा पुरस्कार स्विकारला. सोबत विद्यार्थी संघटना उपाध्यक्षा ऋचा कुलकर्णी, विद्यार्थी संघटना सचिव-ओंकार डांगळे, विद्यार्थी संघटना खजिनदार-रिद्धी पांडे उपस्थित होते.











