न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० मार्च) :- जागतिक पक्षी दिनानिमित्त रोझलॅन्ड रेसीडेन्सी, पक्षीमित्र चंदन चौरसीया व जिग्ना शहा यांच्या संयुक्त विद्यमानाने पिंपळे सौदागर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज लिनियर गार्डन येथे पक्षांसाठी खाद्य भांडी, पाण्यासाठी भांडी तसेच उन्हापासुन घरटी बसवण्यात आली.
या उपक्रमाचे उद्घाटन नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक नाना काटे, जैन सर, कल्याणी निकुंभ, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष झोपे काका, काळुराम कवितके, आरोग्य विभागाचे सोदाई व परिसरातील नागरिक विविध सोसायटी मधील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.















