न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ मार्च) :- डॉ. डी. वाय. पाटिल कॉलेजचा परिसर मधुर संगीत आणि दैदिप्यमान प्रकाशाने गजबजून गेला, याच मुख्य कारण म्हणजे डॉ. डी.वाय.पाटिल कॉलेज ऑफ फार्मसी, आकुर्डी यांनी आयोजित केलेले वार्षिक सांस्कृतिक स्नेहसंमेलन (दृष्टी २०१९)
डॉ. डी. वाय पाटिल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग चे प्राचार्य आणि त्याचबरोबर वाय.बी.पाटिल. पॉलिटेक्निक कॉलेज चे प्राचार्य आणि तसेच डॉ .डी. वाय. पाटिल कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ. एन. एस. व्यवहारे यांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यानंतर फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. एन. एस. व्यवहारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सोबतच त्यांनी उपस्थित सर्व विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष श्री.स्वागत टकले व विविध विभागीय सचिव त्यात “देवेंद्र गोरले”(सांस्कृतिक सचिव) “अभिषेक स्वामी”(सचिव) व (महिला प्रतिनिधी)”रुपाली बिरादार” या सर्वांची प्रशंसा करून त्यांना प्रोत्साहन दिले व त्यासोबतच डी वाय पाटिल कॉलेज ऑफ फार्मसी सांस्कृतिक विभागाचे संचालक श्री.मुकेश मोहिते सर व डॉ .शुभांगी दसवडकर यांच्या मार्गदर्शना बद्दल प्रशंसा केली.
यानंतर गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी नृत्य, गायन, फॅशन शो अशा सांस्कृतिक विविधता दर्शविल्या आणि कार्यक्रमाची शोभा वाढविली. अमित जाधव (प्रथम वर्ष) या विद्यार्थ्याने आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.















