न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ एप्रिल) :- श्री साई मित्र मंडळ, श्री साई मंदिर देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने श्री साईबाबा प्रकटदिन आणि रामनवमी शाहूनगर यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा शनिवार ( दि. ६) ते शनिवार ( दि. १३) एप्रिल दरम्यान साई मंदिर डॉ. डी. वाय. पाटील शाळेशेजारी, शाहूनगर येथे संपन्न होणार आहे. या निमित्त श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा, श्री. साई सच्चरित्र पारायण सोहळा, संगीत रजनी अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवारी (दि. ६) रोजी दुपारी साडेतीन ते साडेपाच या वेळेत भव्य कलश रथयात्रा काढण्यात येणार आहे. यावेळी दिव्य ज्योती जागृती संस्था, दिल्ली येथील स्वामी चिदानंद महाराज उपस्थित राहणार आहेत. दिव्य ज्योती जागृती संस्था, चाकण येथील ब्रहानाद ढोल पथक हे या रथ यात्रेचे प्रमुख आकर्षण असणार आहे. “त्यानंतर मथुरा. (वृंदावन) येथील पंडित श्री ठाकूर महाराज यांच्या सुमधुर वाणीमधून श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याला प्रारंभ होईल.
शनिवारी ( दि. १३) रोजी या सोहळ्याचा समारोप सिन्नर येथील हभप प्रकाश महाराज पवार यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार आहे. त्याचप्रमाणे शनिवार (दि. ६) ते शुक्रवार ( दि. १२) एप्रिल दरम्यान सकाळी साडेनऊ ते साडेबारा वाजेपर्यंत श्री साई सच्चरित्र पारायण सोहळा होणार आहे. व्यासपीठ चालक म्हणून हभप चंद्रकांत कुलकर्णी तसेच साईभक्त साईप्रेमी काम पाहणार आहेत.










