न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ एप्रिल) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेला विविध करांतून वार्षिक उत्पन्न मिळत असते. २०१८-१९ या आर्थिक वर्षात मिळकत कर, बांधकाम परवाना, पाणीपट्टी, आकाश चिन्ह व परवाना या विभागातून उत्पन्न मिळाले आहे. शहरात एकूण पाच लाख सहा हजार ९२७ मिळकती आहेत. त्यातून १ हजार २५ कोटींचा महसूल महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे.
गेल्यावर्षी महापालिकेला तब्बल दोन हजार ९०० कोटींचा महसूल मिळाला होता. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी मात्र उत्पन्नात बरीच तफावत आहे. परंतु, महापालिकेला बांधकाम विभागाने चांगला कर मिळवून दिला आहे.
बांधकाम विभागाला ४५५ कोटी रुपये उत्पन्नाचे उदिष्ट होते. विभागाने ते पूर्ण केले असून ५५ कोटी रुपये अधिक उत्पन्न मिळविले आहे, असे सह शहर अभियंता राजन पाटील यांनी सांगितले.









