- ब्लास्टिंग तीव्रता कमी करा; भाजपचे अमित गोरखे यांची आयुक्तांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ ऑगस्ट २०२३) :- चिंचवड येथील ऑटो क्लस्टर समोरील जमिनीवर पालिकेच्या वतीने नवीन इमारतीचे खोदकाम चालू आहे. या खोदकामात वापरल्या जाणाऱ्या ब्लास्टिंगमुळे शेजारील एम्पायर स्क्वेअर या इमारतीच्या रहिवाशांना त्रास होत असून इमारतींना धोका पोहोचत आहे.
या ब्लास्टिंगच्या हेवी डेन्सिटीमुळे इमारतीला तडे बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. या ब्लास्टिंगमुळे काही काचा तुटण्याचा प्रकार नुकताच घडला. तसेच सकाळी लवकर काम चालू होऊन रात्री उशिरापर्यंत चालत असल्याने त्या आवाजाचा त्रासही या इमारतधारकांना होत आहे. याची दखल घेत भाजपा पिंपरी विधानसभेचे निवडणूक प्रमुख अमित गोरखे यांनी एम्पायर स्क्वेअर समितीच्या शिष्टमंडळासह महापालिका आयुक्त शेखर सिंह यांची नुकतीच भेट घेतली.
यावेळी अमित गोरखे यांच्यासोबत एम्पायर स्क्वेअर सोसायटीतील विनीत कदम, तुषार शिंदे, संजय साळुंखे, विजय गुप्ता, झिशान खान, केतन पारख, जगताप, मेहता आदी उपस्थीत होते.

















