न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मुंबई (दि. ३ एप्रिल) :- बारामती लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांची एकुण संपत्ती १४० कोटी ८८ लाख ८८ हजार ७०२ रुपयांची असल्याचे त्यांनी दिलेल्या शपथ पत्रात नमुद करण्यात आलेले आहे. मागील पंचवार्षिक निवडणूकीच्या तुलनेत त्यांच्या संपत्तीत २६ कोटी ८८ लाख ८८ हजार ७०२ रुपयांची वाढ झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. मागील निवडणूकीत त्यांती संपत्ती ११३ कोटी ९० लाख रुपयांची होती.
एकुण संपत्तीपैकी स्वतः सु्प्रिया सुळे यांच्या नावावर ३९ कोटी ६७ लाख ३६ हजार २५३ रुपये , पती सदानंद सुळे यांच्या नावावर ८८ कोटी ११ लाख ३० हजार ८५५ रुपये, मुलगी रेवती हिच्या नावे ८ कोटी ९२ लाख ८ हजार १४५ रुपयांची तर, मुलगा विजय याच्या नावे ४ कोटी १८ लाख १३ हजार ४४९ रुपयांची मालमत्ता आहे.
या मालमत्तेत जंगम मालमत्ता, स्थावर मालमत्ता आणि बंधपत्रे, ऋणपत्रे, शेअर्स, मोटारगाड्या, सोने-चांदी आदींचा समावेश आहे.










