न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० ऑगस्ट २०२३) :- वेगवेगळे कारणे सांगुन आरोपींनी फिर्यादीकडुन गुगल पे व्दारे व इतर माध्यमातुन एकुण ३,८९,००० रुपये घेतले. पैसे घेत असताना गावाकडील जमिन विकुण पैसे परत देतो, असे बोलून पैसे घेतले.
फिर्यादीला आरोपीने गावकडील जमिन विकल्याबाबत माहिती मिळाली. फिर्यादीने आरोपीकडे पैशांची मागणी केली असता वेगवेगळी कारण सांगुन टाळाटाळ केली. फिर्यादीला पैसे परत न देता आरोपी क्र. १ व त्याची आई आरोपी क्र २ यांनी फिर्यादीची फसवणुक केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. २२/०१/२०२० ते दि. २९/०८/२०२३) दरम्यान यादव वस्ती, गोलंडी, ता. इंदापुर, जि.पुणे येथे घडली. फिर्यादी अजिनाथ विठ्ठल सावंत यांनी आरोपी १) प्रदिप दशरथ यादव, २) त्याची आई यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
देहूरोड पोलिसांनी ४८३/२०२३ भा.दं.वि कलम ४०६, ४२०, ३४ नुसार दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि पाटील पुढील तपास करीत आहेत.












