- ‘जिवे ठार मारुन नदीत फेकुन देवू’; धमकी देणारे दोघे गजाआड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ ऑगस्ट २०२३) :- ‘तु माझ्या बायकोला मॅसेज का करतो?’ या कारणावरुन चिडुन जावुन आरोपी क्र १ याने फिर्यादीच्या मुलास शिवीगाळ आणि लाथाबुक्यांनी, हाताने मारहाण केली. तसेच आरोपी क्र. २ याने तेथील फरशीचा तुकडा उचलून फिर्यादीच्या मुलाच्या डाव्या गालावर मारून त्याला दुखापत केली. तसेच ‘जिवे ठार मारुन नदीत फेकुन देवू’ अशी धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद आहे.
ही घटना (दि. ३०) रोजी १०:३० च्या सुमारास खेड तालुक्यातील शेलपिंपळगाव येथील नविन ग्रामपंचायतीच्या बांधकामा समोरील रस्त्यावर घडली. फिर्यादी बिनतुगलक मजिद शेख यांनी आरोपी (१) नितीन रामदास कराळे, २) त्याचा मित्र प्रमोद ऊर्फ भावड्या पंडीत कदम (दोन्ही रा. शेलपिंपळगाव) यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
चाकण पोलीस ठाण्यात ६९३/२०२३ भा.दं.वि कलम ३२४, ५०४, ५०६, ३२३,३४ नुसार गुन्हा दाखल असून दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. पोना वाडेकर पुढील तपास करीत आहेत.







![खेड [शेलपिंपळगाव] :- 'तु माझ्या बायकोला मॅसेज का करतो?'..](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/08/mqdefault-90x60.jpg)
![खेड [शेलपिंपळगाव] :- 'तु माझ्या बायकोला मॅसेज का करतो?'..](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/08/images-20-90x60.jpeg)



