न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ ऑक्टोबर २०२३) :- आपसात संगणमत करुन आरोपी यांनी सुरज किशोर कांबळे (वय ३० वर्षे रा. थेरगांव) याचा शिवीगाळ केल्याच्या कारणावरुन चाकुने गळ्यावर वार करुन खून केला. त्याची मयत बॉडी पुरावा नष्ट करण्याच्या हेतुने टेम्पोतुन बावधन येथे नेवुन कोठेतरी टाकुन दिली आहे, असे फिर्यादीत नमूद आहे.
ही घटना (दि ५) रोजी रात्री ११.०० च्या सुमारास मल्हारनगर कॉलनी नं. ०५, थेरगांव, वाकड येथे घडली. पंकज रतन पाचपिंडे (वय २८ वर्षे रा.थेरगांव), २) अमरदीप ऊर्फ लखन दशरथ जोगदंड (वय ३३ वर्षे रा. थेरगांव गावठाण) यांच्या विरोधात वाकड १००८/२०२३, भादंवि कलम ३०२, २०१, ३४ नुसार गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक केली आहे. सपोनि दाभाडे पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान या प्रकरणात एकंदरीत तीन चांगले मित्र दारु पित बसले असताना शिवीगाळ केल्याच्या किरकोळ कारणावरुन त्यांच्यात वाद होवुन त्यांनी मित्राचा खुन केला आहे. तसेच खुन केल्यानंतरही खुन लपविण्यासाठी त्याची बॉडी नाल्यात टाकुन आपले नियमीत काम करीत होते. तसेच पोलीसांना माहीती मिळेल याची जाणीव झाल्यावर फोन बंद करुन अंबाजोगाई जि.बिड येथे जावून आपले अस्तित्व लपवून बसलेल्या दोन आरोपींना वाकड पोलीसांनी अटक केली आहे. अटक आरोपींना दिनांक २४/१०/२०२३ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी प्राप्त असून तपास चालू आहे.















