न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ नोव्हेंबर २०२३) :- भोसरीतील महानगर बँकेच्या शाखेतील कर्जदार वसंत इलेक्ट्रॉनिक्स यांनी कर्जाचे हफ्ते नियमीत न भरल्यामुळे तसेच कर्जाची संपुर्ण परतफेड करण्यास असर्थता दर्शविल्याने बँकेने सिक्युरीटायझेशन अॅक्ट २००२ नुसार जिल्हा दंडाधिकारी पुणे यांचेकडे अर्ज केला होता. त्यांनी दिलेल्या आदेशान्वये तहसिलदारांनी मिळकतीला कुलूप लावुन सील करुन ती बँकेच्या ताब्यात दिली होती. असे असताना कर्जदार आरोपी क्र. १ ते ५ यांनी सदर मिळकतीला असलेले सील व कुलूप बँकेची कोणतीही परवानगी न घेता तोडुन अनधिकृतपणे तीचा ताबा घेतला आहे. तसेच या मिळकतीमध्ये बँकेने ठेवलेले महत्वाची कागदपत्रे, जुने कॉम्प्युटर व कॅश काउंटींग मशिन अंदाजे २,००,००० रुपयांच्या वस्तु या बँकेच्या परवानगीशिवाय चोरी करुन आरोपी घेवुन गेले आहेत, असे फिर्यादीत नमूद आहे.
शिवाजी खंडागळे यांनी १) महिला आरोपी, २) वसंत दसगुडे, ३) प्रविण दसगुडे, ४) प्रदिप दसगुडे व ५) महिला आरोपी यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
भोसरी पोलिसांनी ८७५ / २०२३ भा.द.वि. कलम ४४७, ४४८, ३८० प्रमाणे आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि पवार पुढील तपास करीत आहेत.