- निगडी पोलीस वाहतुक विभागाकडून वाहतुकीत बदल..
- वाचा… कसे असतील बदल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जानेवारी २०२४) :- महाराष्ट्राचे कुलदैवत व आकुर्डी गावचे ग्रामदैवत श्री खंडोबा उत्सवानिमित्त (दि. १६ व १७) जानेवारीला विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री खंडोबा देवस्थान ट्रस्ट श्री खंडोबा उत्सव समिती व समस्त ग्रामस्थ मंडळ आकुर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने येथील खंडोबा मंदिरात दोन दिवसांचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. उत्सवानिमित्त कुस्त्यांचा आखाडा भरविण्यात येणार असून सिने अभिनेत्री राधिका पाटील यांचा लावण्यचंद्रा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
उत्सवाची सुरुवात मंगळवारी पहाटे श्रींना मंगल स्नान व महाभिषेक करून होणार आहे. सायंकाळी श्रीची महाआरती होणार असून श्रींचा पालखी सोहळा संपन्न होणार आहे. श्रींच्या पालखी सोहळ्यामध्ये ग्राम प्रदक्षिणा करण्यात येणार असून ढोल पथक, गोंधळी पथक सहभागी होणार आहेत. यावेळी महाकाल उज्जैन वाद्य पथक येणार आहे. नगर प्रदक्षिणेच्या समारोपप्रसंगी फायर शो आयोजित होणार आहे. गावजात्रा मैदानावर कुस्त्यांचा भव्य आखाडा भरविण्यात येणार आहे. विजेत्या पहिलवानांसाठी दोन दुचाकी व चांदीची गदा पारितोषिक देण्यात येणार आहे. कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री खंडोबा देवस्थान ट्रस्ट उत्सव समिती आकुडर्डी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
दरम्यान यात्राकाळात खंडोबा मंदिरात अंदाजे दोन लाख भाविक दर्शनास येत असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होवुन वाहतुक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामळे निगडी पोलीस वाहतुक विभाग अंतर्गत पहाटे ०५.०० ते रात्री १००० वा. चे दरम्यान आवश्यकतेनुसार वाहतुक वळविण्याबाबत अधिसुचना जारी करण्यात आली आहे. वाहतुकीतील बदल पुढीलप्रमाणे…
१) थरमॅक्स चौकाकडुन येणारी वाहतुक ही आर. डी. आगा मार्गाकडुन गरवारे कंपनी कंपाऊंड पर्यंत येवुन तेथील टी जंक्शन वरुन खंडोबामाळ चौकाकडे न जाता ती डावीकडुन परशुराम चौकाकडुन मोहननगर चिंचवड मार्गे इच्छित स्थळी जातील.
२) परशुराम चौकाकडुन येणारी वाहतुक हि खंडोबामाळ चौकाकडे न येता ती परशुराम चौकातुन आर.डी आगा मार्गे गरवारे कंपनी कंपाऊंड टी जंक्शन वरुन उजवीकडे वळुन इच्छित स्थळी जातील.
३) चिंचवड, दळवीनगर व आकुर्डी गावठाणातुन येणाऱ्या वाहनांना खंडोबामाळ चौकाकडुन थरमॅक्स चौकाकडे जाण्यास प्रवेश बंद करण्यात येत असुन सदरची वाहणे हि टिळक चौक / शिवाजी चौक बाजुकडे वळुन इच्छितस्थळी जातील.
४) टिळक चौकाकडुन येणाऱ्या वाहनांना खंडोबामाळ चौकातुन थरमॅक्स चौक बाजुकडे जाण्यास प्रवेश बंद करण्यात येत असुन सदरची वाहने सरळ चिंचवड स्टेशन/ दळवीनगर मार्गे इच्छितस्थळी जातील