न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ फेब्रुवारी २०२४) :- हिंदुत्वांच्या प्रखर विचारांनी प्रेरीत होवुन थेरगाव येथे खा. श्रीरंग बारणे, पिंपरी चिंचवड शहर संघटक निलेश हाके, शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, पिंपरी विधानसभा प्रमुख निखिल येवले यांच्या उपस्थितीत अनेकांनी (शिवसेना-एकनाथ शिंदे गटात) जाहीर प्रवेश केला. त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
दीपक शेरखाने (विभाग प्रमुख) फुगेवाडी -दापोडी -कासारवाडी, अजय कदम (उपविभाग प्रमुख ), मनोज काची (उपविभाग प्रमुख), अमर अडसूळे (शाखाप्रमुख ), सचिन कोष्टी (शाखप्रमुख ), महेंद्र पोळके (शाखा प्रमुख ), अविनाश जाधव (शाखप्रमुख ), गणेश काटे (शाखा प्रमुख) आदींची नियुक्ती करण्यात आली आहे.













