न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे प्रतिनिधी :- पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ‘संविधान बचाव, देश बचाव’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम ३ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, मा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थिती होणार असल्याची माहिती मा. मंत्री फौजिया खान यांनी माध्यमांना दिली.
खान म्हणाल्या देशात असहिष्णुतेचे वातावरण वाढले आहे असून भाजप सरकारने सर्वोच्च कायदेमंडळ हाती घेतले आहे व त्यामाध्यमातून लोकशाही धोक्यात आणली आहे. तसेच ईव्हीएम मशीनचा दुरुपयोग करून निवडणूक यंत्रणा हॅक केली आहे व लोकशाही मूल्य पायदळी तुडवली जात असल्याचा आरोप त्यांनी भाजप सरकारवर केला.
राष्ट्रवादी काँग्रेसने संविधान बचाव, देश बचाव हा कार्यक्रम दिल्ली, मुंबई, नाशिक, औरंगाबाद याठिकाणी घेतला असून नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर यात सहभाग नोंदवला आहे. पक्षाच्या वतीने पुण्यानंतर औरंगबाद आणि कोकण विभागातही हा कार्यक्रम घेणार असल्याचे खान यांनी सांगितले.
यावेळी खासदार वंदना चव्हाण, विद्या चव्हाण, महिला शहराध्यक्षा रुपाली चाकणकर, वैशाली नागवडे आदी पदाधिकारी व महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
















