- राज्यभरातील एसटी सेवा पूर्वरत होणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ सप्टेंबर २०२४) :- एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेत असल्याचे जाहीर केलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांपासून कामबंद आंदोलन सुरू केलं होतं. त्यामुळे विस्कळीत झाली होती.
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथी गृहावर झालेल्या बैठकीत राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या असून त्यांच्या पगारात घसघशीत वाढ करण्यात आली आहे.
सरकारने कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात साडे सहा हजार रुपयांची वाढ करण्याचे मान्य केलं आहे. तसेच ज्यांना कर्मचाऱ्यांना गुन्हे दाखल झाल्याने बडतर्फ करण्यात आले आहे. त्यांना पुन्हा कामावर घेण्याचंही सरकारने मान्य केलं आहे. सरकारच्या या निर्णयानंतर एसटी कर्मचारी संघटनांनी समाधान व्यक्त केलं आहे.