न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ सप्टेंबर २०२४) :- गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवश महिला व कुमारिका हरतालिकेचे व्रत करतात. यासाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीसाठी शहरातील बाजारपेठांत महिलांची गर्दी दिसून आली. बाजारात हरतालिकेच्या मूर्त विक्रीस उपलब्ध आहेत.
भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षातील तृतीयेला हरितालिकेचे व्रत केले जाते. विवाहित महिला आपल्या पतीच्य दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात. तर अविवाहित मुली इच्छित वर मिळवण्यासाठी हे व्रत करतात. या दिवशी शंकर आणि पार्वतीची पूजा करण्याची परंपरा आहे. या दिवर्श मातीचे गौरी शंकर किंवा शिवलिंग बनवले जातात. पूजेपूर्वी विवाहीत स्त्रिया सौभाग्याचे अलंकार घालून सुंदर तयारी करतात. तसेच, वाळू किंवा मातीपासून हे शिवलिंग किंवा शिव, पार्वती आणि गणेशाच्या मूर्ती बनवतात.
मात्र, सध्या धावपळीच्या युगात नोकरदार महिलांना या सर्व गोष्ट करणे जमत नाही. तसेच शहरी भागात माती मिळणेदेखील कठीण असते. त्यामुळे रेडिमेड हरतालिका आणि सोबत शिवलिंग असलेल्या मूर्तींना मागणी असते.