न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ मे २०१९) :- लग्नाचे आमिष दाखवत तरुणीच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याप्रकरणी सोमवारी (दि. ६) रोजी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामलाल थानाराम मेघवाल (वय ३०, सध्या रा. दापोडी, मूळ रा. राजस्थान) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी २८ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे.











