न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ सप्टेंबर २०२४) :- येवलेवाडी येथे दुपारी दिड वाजता एका काचेच्या कारखान्यात माल उतरवताना काचा फुटल्याने झालेल्या अपघातात दुर्देवाने चार कामगारांचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, येवलेवाडी येथे दुपारी दिड वाजता एका काचेच्या कारखान्यात माल उतरवताना काचा फुटल्याने पाच कामगार अडकल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली होती.
अग्निशमन दलाच्या जवानांनी पाच ही कामगारांना गंभीर जखमी अवस्थेत बाहेर काढून ससून रुग्णालयात दाखल केले. परंतु त्या ५ कामगारांपैकी ४ जणांचा दुर्दैवी मृत्यूची झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. तर एका कामगारावर उपचार सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे.












