- विधानसभेसाठी भाजपकडून ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० ऑक्टोबर २०२४) :- भाजपकडून आज रविवारी (दि. २०) रोजी अधिकृतपणे तब्बल ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. या यादीत चिंचवडमधून भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांना तर, भोसरीतून महेश लांडगे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे.
विद्यमान आमदार अश्विनी जगताप यांना यावेळी पक्षाने सोयीस्करपणे बगल दिली असून त्यांच्याऐवजी भाजपने त्यांचे दीर शंकर जगताप यांना चिंचवडमधून तिकीट दिले आहे. तर, पुण्यातून कोथरूड चंद्रकांत पाटील, शिवाजीनगरमधून सिद्धार्थ शिरोळे, पर्वतीतून माधुरी मिसाळ यांनाही उमेदवारी जाहीर झाली आहे.
भाजपकडून पहिल्या यादीत ९९ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. या यादीत अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तसेच काही जणांची तिकीट कापण्यात आले आहे. तर अनेक ठिकाणी विद्यमान आमदारांना संधी देण्यात आली आहे.
यादी पुढीलप्रमाणे…

















