न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ ऑक्टोबर २०२४) :- २०६ पिंपर विधानसभा मतदारसंघात शुक्रवारी (दि. २५) चौथ्या दिवशी एकुण १४ व्यक्तींनी निगडी येथील निवडणूक कार्यालयातुन एकुण २३ नामनिर्देशन अर्जांची खरेदी केली आहे.
आज नामनिर्देशन पत्रे घेणाऱ्या व्यक्तींची नावे पुढीलप्रमाणे…
सचिन मनोहर गायकवाड (राष्ट्रवादी कॉग्रेस,शरदचंद्रजी पवार), मिनाताई यादव खिल्लारे (महाराष्ट्र लहुजी सेना), भारती चंद्रकांत चांदणे, सौ.मंगाल भिकाराम कांबळे, स्वप्नील दादाराव कांबळे (रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीया आठवले गट), भाऊ रामचंद्र अडागळे (महाराष्ट्र मजूर पक्ष), सुरेश मधुकर लोंढे, नरसिंग ईश्वरराव कटके, मनोज भास्कर गरबडे, अनिल श्रीपती सोनवणे, डॉ. सिद्धांत अनिल सोनवणे, प्रफुल्ला शैलेंद्र मोतलिंग, जितेश सुरेश वाल्हेकर, डॉ. रामदास ताठे (पिपल्स रिपब्लीकन पार्टी कवाडे गट).
तसेच आज अखेर एकुण ७७ व्यक्तींनी एकुण १५३ नामनिर्देशन पत्रे विकत घेतली असुन एका उमेदवाराने एक नामनिर्देशन पत्र दाखल केले असून आज अखेर २ नामनिर्देशन दाखल करण्यात आले आहे.