न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० नोव्हेंबर २०२४) :- चिंचवड विधानसभेसाठी आज बुधवारी (दि. २०) रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी आंगणवाडी सेविकांनी चिंचवडेनगर येथील गुरुमैय्या विद्यालयाच्या मतदान केंद्रात मतदानासाठी आलेल्या मतदारांच्या सोयीसाठी पाळणाघर उपक्रम राबविला.
मतदारांची लहान मुल, मुलींचा काही वेळ त्यांनी सांभाळ केला. त्यामुळे मतदारांना शांतपणे मतदान करता आले.
या उपक्रमाला मतदार पालक व महिला मतदार यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. तसेच मतदार पालकांनी मनापासून कौतुक करुन अंगणवाडी सेविका, मदतनीस माया कुलथे व कलावती नाटीकर यांचे आभार मानले.

















