न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० नोव्हेंबर २०२४) :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला मतदानाचा अधिकार नाकारला. त्यामुळे कामगार नेते बाबा कांबळे यांना आंदोलन करावे लागले. त्याची दखल घेतल्यानंतर त्यांना मताचा अधिकार मिळाला. त्यांनी मतदान केले.
निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव तसेच जनसंपर्क अधिकारी पुराणिक व स्थानिक पोलीस अधिकारी यांनी मध्यस्थी करून मूळ आधार कार्डवर तुम्हाला मतदान करून द्यावे लागेल, अशी भूमिका घेतल्यामुळे बाबा कांबळे यांना मतदानाचा अधिकार बजावता आलेला आहे.
याबाबत बाबा कांबळे म्हणाले, निवडणूक प्रक्रियेमध्ये कुशल अधिकाऱ्यांमुळे हे सगळा प्रकार घडला मी मूळ निवडणूक कार्ड घेऊन गेल्यानंतरही मला मतदानाचे ओळखपत्र मागवण्यात आले, हे चूक होते. मी आधार कार्डवरच मतदानाचा आग्रह धरला. यावेळी सबंधित अधिकाऱ्यांनी ते मान्य केले नाही. परंतु, याबाबत व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव तसेच जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी हा व्हिडिओ पाहिला. त्यांनी स्वतः फोन करून याप्रकरणी तुम्ही आतमध्ये जा. तुम्हाला मतदान करून दिले जाईल, असे सांगितले. स्थानिक पोलीस घटनास्थळी आल्यानंतर संबंधित अधिकारी यांनी मतदान करून दिले आहे, अशा प्रकारची माहिती बाबा कांबळे दिली आहे.

















