- तब्बल अकराशे प्रकरणे लोकअदालतीत हातावेगळे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ डिसेंबर २०२४) :- पिंपरी न्यायालयात पुणे जिल्हा विधी प्रधिकरण तसेच पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट बार असोशिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने राष्ट्रीय लोकअदालीचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. यात दाखल तसेच, दाखल पूर्व खटले तडजोडी साठी ठेवण्यात आले होते. या माध्यमातून ३ कोटी २६ लाख रुपयाचा महसूल जमा झाला
पिंपरी नेहरूनगर न्यायालयात दिवाणी व फौजदारी स्वरूपाचे एकूण २३८ खटले निकाली काढण्यात आले. त्यात १ कोटी ७२ लाख ७३८ किमतीचे दावे निकाली निघाले. तर आकुर्डी पिंपरी चिंचवड न्यायालयात येथे दाखलपूर्व पाणीपट्टी व मिळकत कराची एकूण ८९४ खटले निकाली काढण्यात आले. त्यामध्ये १,५४,२३,०८२/- रुपये महसूल जमा झाला व वाहतुक चलनाच्या प्रकरणात ६२,२००/- दंड जमा झाल्याने एकूण ३,२६,८६,०२०/- चा महसूल दंड स्वरूपात शासनाच्या तिजोरीत जमा झाला आहे.
असोसिएशन अध्यक्ष ॲड. गौरव वाळुंज यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून उद्घाटन झाले. प्रमुख न्यायाधीश मे. गजभिये यांनी उपस्थित वकील व पक्षकारांना लोकअदालतीचे महत्व सांगत मार्गदर्शन केले. यावेळी राणी पुतळाबाई महिला विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी व प्राध्यापक, नागरिक व मोठ्या प्रमाणात वकिल बांधव उपस्थित होते.
नेहरूनगर न्यायालयाचे न्यायाधीश एल ए.के.एमुदी, बी.डी.चोखट व आकुर्डी न्यायालयात वी.एस.डामरे यांनी तर पॅनल ॲडव्होकेट म्हणुन ॲड.विवेक राऊत, ॲड. अस्मिता पिंगळे, ॲड. निधी बारमेडा व ॲड. बरखा पालवे यांनी कामकाज पाहिले. कार्यक्रमाची सुरवात पिंपरी न्यायालयातील उपस्थित न्यायाधीश व पिं.चि.ॲड.बार असोसिएशनचे यांच्या उपस्थितीत झाली.
पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचे व, सचिव ॲड. उमेश खंदारे, महिला सचिव ॲड. रीना मगदूम, सहसचिव ॲड. राकेश जैद, खजिनदार ॲड. अक्षय फुगे, सदस्य ॲड. मानसी उदासी, ॲड. संकेत सरोदे, ॲड. विकास शर्मा, ॲड. संघर्ष सुर्यवंशी यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ॲड.उमेश खंदारे व आभार ॲड.संकेत सरोदे यांनी मानले.
तब्बल दोन वर्षाहुन अधिककाळ सुरू असलेल्या दोन सख्या भावांमधील न्यायालय वाद अखेर संपुष्टात आला. न्यायप्रलंबीत असलेला एक दिवाणी दावा व एक फौजदारी प्रकरण सामज्यासाने मिटवले. या दोघा भावांच्या मध्ये दिवाणी दावा तसेच कुलमुखत्यारपत्राअन्वये खरेदीखत रदद बाबत खटला सुरू होता. लोक अदालतमध्ये एकत्रित येवून सामंजस्याने वाद मिटवण्याचे दोघांमध्ये ठरले. या दोन्ही प्रकरणा मध्ये ॲड. योगेश थंबा-कव्हेकर व वादी तथा फिर्यादी यांच्या वतीने ॲड. ऊज्वला पिलाने यांनी राष्ट्रीय लोकअदालतीचे औचित्य साधुन त्यावर तोडगा काढून प्रकरण निकाली काढले. दोघांच्या समजुतीने दोन्ही दिवाणी व फौजदारी प्रकरण निकाली काढण्यात आले.

















1 Comments
Ute Mclauchlin
I will immediately seize your rss feed as I can not in finding your email subscription link or e-newsletter service. Do you have any? Kindly permit me realize in order that I may just subscribe. Thanks.