न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि.१६ डिसेंबर २०२४) :- राज्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघांमध्ये महापालिकेच्या वतीने जनजागृती करण्यात आली होती. त्याकरिता महापालिका प्रशासनाने २७ लाख, ६३ हजार, २३२ रुपये खर्च केला आहे. स्थायी समितीच्या बैठकीत या खर्चाला आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मंजुरी दिली आहे.
विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक २० नोव्हेंबर २०२३ रोजी पार पडली. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत पिंपरी, चिंचवड व भोसरी या तीन मतदार संघ समावेश होतो. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने जनजागृती करण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाला देण्यात आले होते.
त्यादृष्टीने महापालिका प्रशासनाने या तीनही विधानसभा मतदार संघात विविध ठिकाणी मतदानाविषयी जनजागृतीचे विविध उपक्रम राबविले. त्यामध्ये पथनाट्य, फ्लॅशमॉब, रिक्षांवर विविध प्रकारची मतदानाची जाहिरात करण्यात आली. निवडणुकीपुर्वी मतदानासाठी केलेल्या २७ लाख, ६३ हजार, २३२ रुपये खर्चास मान्यता देण्यात आली आहे.

















1 Comments
Laurine Winkelbauer
Greetings! Very helpful advice on this article! It is the little changes that make the biggest changes. Thanks a lot for sharing!