न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ डिसेंबर २०२४) :- रुममध्ये डोकावून का पाहिले? याचा जाब विचारल्यामुळे महिलेवर स्क्रू ड्रायव्हरने हल्ला करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना चाकण जवळील आंबेठाण या गावात (दि. १८) रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे.
या घटनेप्रकरणी गणेश शांताराम जावळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयसिंग लखनलाल श्रीवास यांनी याबाबत तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी आठच्या सुमारास आरोपी गणेश शांताराम जावळे हा तक्रारदार यांच्या रूममध्ये डोकावून पाहत होता. तक्रारदार यांची पत्नी घरी होती. आमच्या रूममध्ये डोकावून का पाहत आहात? असं म्हणत चापट मारली. याच रागातून तक्रारदार यांच्या पत्नीवर जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्याच घरातील किचन ओट्यावर असलेल्या स्क्रू ड्रायव्हरने महिलेच्या गळ्यावर, गालावर, हात आणि पायावर ठिकठिकाणी वार करण्यात आले. जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
याप्रकरणी जयसिंग यांनी महाळुंगे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. गणेश जावळे याला पोलिसांनी अद्याप अटक केलेली नाही. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

















1 Comments
Shayne Boldery
Hi there, You’ve done an excellent job. I’ll definitely digg it and personally suggest to my friends. I am sure they’ll be benefited from this website.