- महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांची माहिती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मुंबई (दि. 17 जानेवारी 2025) :- लाडकी बहीण योजना सुरूच रहाणार असून, वाढीव रकमेबाबत येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात निर्णय घेतला जाणार आहे. जानेवारीचा हप्ता हा 1500 रुपयांचा असणार आहे.
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना जानेवारी २०२५ चा हफ्ता मिळण्याची तारीख सरकारने सांगितली आहे.
२६ जानेवारीच्या आधी जानेवारी महिन्याचा १५०० रुपयांचा हफ्ता बँकेच्या खात्यामध्ये जमा होईल, अशी घोषणा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केली आहे.
आदिती तटकरे म्हणाल्या की, २६ जानेवारीच्या आधी जानेवारी महिन्याचा लाभ देण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी ३,६९० कोटींचा निधी विभागाला मिळणार आहे. अर्थसंकल्पातही महिलांना अधिक लाभ देण्यासाठी निधीची तरतूद केली जाईल. सरकारकडून फेब्रुवारी महिन्याचेही नियोजन केले जात आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ २ कोटी ४६ लाख महिलांना दिला जात आहे. काही महिलांबाबत तक्रार आली होती. बनावट केसेस फारच कमी होत्या त्यांना लाभ देणे बंद केले जाईल. त्यामुळे योजनेत कोणता फरक पडेल असे मला वाटत नाही.