न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ मे २०१९) :- घरगुती वादातून आयटी अभियंत्याने भरधाव रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (दि. १५) रोजी पहाटे तीनच्या सुमारास कासारवाडी रेल्वेस्थानकाजवळ घडली.
दीपक बापू वारुडे (वय ३३, रा. संत तुकारामनगर, मूळगाव सिंदखेड, धुळे) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. ते बाणेर येथे एका आयटी कंपनीत अभियंता पदावर कार्यरत होते. त्यांच्या मागे पत्नी आणि एक पाच वर्षांचा मुलगा असा परिवार आहे.















