न्यूज पीसीएमसी नेटवर्क
सांगावी (दि. १६ मे २०१९) :- पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी उपनगर परिसरातील संरक्षण खात्याच्या ( सीक्यूएई ) परिसरातील जंगलात सोमवार (दि. १३) रोजी बिबट्याचा वावर असल्याचे निदर्शनास आले आहे.
यामुळे सीक्युएई प्रशासनाकडून सर्व कर्मचारी, रहिवाश्यांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. यासंदर्भातील अधिकृत परिपत्रकही जारी करण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसापासून खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. शहरी भागात बिबट्या दिसल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.











