- पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या हस्ते पोलिसांचा सन्मान…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ फेब्रुवारी २०२५) :- नेमबाजी स्पर्धेकरीता पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील दोन महिला अंमलदारांची निवड झाली आहे. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या हस्ते त्यांचा नुकताच सन्मान करण्यात आला.
बालेवाडी शुटींग रेंज, पुणे व वडाचीवाडी, हडपसर येथे पार पडलेल्या महाराष्ट्र पोलीस नेमबाजी स्पर्धेमध्ये आयुक्तालयातील महिला पोलीस अंमलदार मपोहवा ४९० परवीन मेहबुब पठाण व मपोहवा १५२७ पुनम प्रसाद लांडे यांनी दैदिप्यमान यश मिळविले. त्यांची आगामी इंदोर, मध्यप्रदेश येथे होणाऱ्या अखिल भारतीय पोलीस नेमबाजी स्पर्धेकरीता निवड झालेली आहे.
चिंचवड वाहतुक विभागात कार्यरत असणाऱ्या मपोहवा ४९० परवीन मेहबुब पठाण यांनी ५० मिटर रायफल पोझीशनमध्ये सुवर्णपदक तसेच ५० मिटर रायफल पोझीशनमध्ये रजत पदक व ३०० मिटर रायफल पोझीशन प्रकारामध्ये कास्यपदक प्राप्त केले आहे.
आळंदी पोलीस स्टेशन येथे कार्यरत असणाऱ्या मपोहवा १५२७ पुनम प्रसाद लांडे यांनी १० मिटर एअर रायफलमध्ये सुवर्णपदक व ५० मिटर पोझीशन प्रकारामध्ये रजत पदक प्राप्त केले आहे.
यावेळी सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, पोलीस उप-आयुक्त स्वप्ना गोरे, सहा पोलीस आयुक्त चाकण विभाग राजेंद्रसिह गौर आदी उपस्थित होते.














