न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ फेब्रुवारी २०२५) :- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या (पीएमआरडीए) विकास परवाना विभागात प्रतिनियुक्तीचा कालावधी संपल्यानंतरही कार्यरत असलेल्या दोन अधिकाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आले. ‘पीएमआरडीए’चे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी मंगळवारी याबाबतचे आदेश दिले.
दोन्ही अधिकाऱ्यांना त्यांच्या मूळ आस्थापनेत परत पाठवले. विकास परवाना विभागातील सहायक नगररचनाकार अजिंक्य पवार आणि कनिष्ठ आरेखक भीमराव जाधव यांना कार्यमुक्त करण्यात आलेल्यांची नावे आहेत. अजिंक्य पवार हे २० जानेवारी २०२० रोजी, तर भीमराव जाधव हे ३० नोव्हेंबर २०१६ रोजी ‘पीएमआरडीए’मध्ये प्रतिनियुक्तीवर आले होते. या दोघांचाही प्रतिनियुक्तीचा कालावधी संपला होता. दरम्यान, जाधव यांच्या प्रतिनियुक्तीला शासनाने मुदतवाढ दिली होती. मुदतवाढीचाही कालावधी संपला.














