न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ फेब्रुवारी २०२५) :- शाहूनगर, संभाजीनगर भागातील विनापरवाना टपऱ्या, हातगाड्यांवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अ-क्षेत्रीय कार्यालयाच्या पथकाने मंगळवारी (दि.१८) अतिक्रमण विरोधी कारवाई केली.
कारवाईत चार हातगाड्या, दोन टपऱ्या व इतर साहित्य जप्त करण्यात आले. वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या आणि रस्ते, पदपथावर अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्या अनधिकृत विक्रेत्यांवर महापालिकेतर्फे कारवाई सुरू आहे.
क्षेत्रीय कार्यालयांच्या पथकाकडून नियमितपणे ही कारवाई केली जात आहे. अ-क्षेत्रीय कार्यालयाच्या पथकाने ही कारवाई केली. क्षेत्रीय अधिकारी शीतल वाकडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालय अधीक्षक वंदना ठाकरे, कर्मचारी राजाराम पवार, नारायण केसवड, हनुमंत कडे, गणेश गव्हाणे यांच्या पथकाने एमएफएस जवानांच्या मदतीने ही कारवाई केली.
कारवाईत जप्त करण्यात आलेल्या टपऱ्या, हातगाड्या व इतर साहित्य नेहरूनगर येथील गोदामात जमा करण्यात आले आहे. या पुढेही अतिक्रमण विरोधी कारवाई सुरूच राहणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.














