न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ फेब्रुवारी २०२५) :-हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आकुर्डीतील पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यालयात शिवरायांना अभिवादन करण्यात आले.
प्राधिकरणाच्या प्रशासन विभागाचे सहआयुक्त किरणकुमार काकडे यांनी शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यावेळी उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी बी.एन. पाटील, कार्यकारी अभियंता कांडगावे, पाटील यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.














