- वाहनचालकांना केलं शिवचरित्राचं वाटप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ फेब्रुवारी २०२५) :-चित्रपट अभिनेत्री आर्या घारे हिने आगळ्यावेगळ्या उपक्रमाद्वारे आज शिवजयंती साजरी केली. नाचून नव्हे शिवचरित्र वाचून शिवजयंती साजरे करू या असा संकल्प करून तिने आपल्या मैत्रिणींसह पिंपरीतील मोरवाडी चौक येथे शिवचरित्राचे वाटप केले.
मोरवाडी चौकात जवळपास तीन हजार पुस्तक तिने वाहन चालकांना व नागरिकांना वाटप केले. चौकात बंदोबस्ताला असलेल्या वाहतूक पोलिसांना देखील हे चरित्र देऊन तिने सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा व्यक्त केल्या. नववारी साडीमध्ये आपल्या पारंपारिक पोशाखात कपाळावर चंद्रकोर काढून तिने केलेल्या या उपक्रमाचे हजारो लोकांनी कौतुक केले.
आर्या घारे हीने देऊळ बंद, पोस्टर गर्ल, बंदीशाळा, अ ब क, परफ्यूम, भिरकिट आदी चित्रपटातून तिने अभिनय सादर केला आहे त्याचबरोबर बाळूमामाच्या नावानं चांगभलं या टीव्ही सिरीयल मध्ये देखील तिने काम केले आहे.














