- संजय जगदाळे यांची केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ फेब्रुवारी २०२५) :- रुग्णालयातील वार्ड बॉय, सिस्टर, आया, मावशी हे सुध्दा सतत विवीध आजारातील रुग्णांची सेवा करत असतात. तर, दिव्यांग कर्मचारी वर्गाला सुध्दा निवृत्त झाल्यानंतर त्यांचे मुले संभाळत नाहीत. अशा अनेक घटना घडत आहेत. त्यामुळे या घटकालासुध्दा लाड-पागे समितीच्या वारस हक्काच्या शिफारसी लागू कराव्यात अशी मागणी शिव-फुले-शाहु-आंबेडकर विचार कर्मचारी मंचाचे अध्यक्ष संजय जगदाळे यांनी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांची भेट घेत त्यांच्याकडे केली आहे.
यावेळी शाम रोकडे, परशुराम कदम, संजय घुले, महादेव साबळे, सनी भोसले यांच्यासह अनेक कर्मचारी उपस्थित होते. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सफाई कामगारांच्या वारसा हक्काबाबत निर्णय देऊनही पिंपरी चिंचवड महानगरापालिकेने अद्याप त्या आदेशाची अमंलबाजवणी केली नाही, हा मुद्दाही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
सफाई कामगारांच्या वारसा हक्काबाबत मा. उच्च न्यायालयाने जो आदेश दिला आहे. त्याची अमंलबजावणी करायला लावू. त्याबाबत राज्यभरातील सर्वच महानगरपालिका, नगरपालिकांकडून अहवाल मागवून घेतला जाईल. तसेच वॉर्ड बॉय, आया, मावशी व दिव्यांग व्यक्तिबाबत प्रथमच लाड-पागे समितीच्या वारसा हक्काच्या शिफारशीचा मुद्दा पुढे आला आहे. वास्तविक पाहता या घटकाला सुध्दा तशा शिफारशी लागू झाल्या पाहिजे या मताचा मी देखील आहे. या बाबत सर्वच कायदेशीर घटकाचा विचार करुन यावर सुध्दा तोडगा काडला जाईल असे आश्वासन मंत्री रामदास आठवले यांनी दिले आहे.










