- सव्वा कोटींचा दंड थकीत; रयत विद्यार्थी परिषद आक्रमक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. २५ फेब्रुवारी २०२५) :- बालेवाडी येथील मालपाणी नामक बांधकाम व्यावसायिकाने विद्युत केबल टाकण्यासाठी विनापरवाना रस्ते खोदाई केली होती. त्यामुळे पुणे महानगरपालिकेने या आस्थापनेला रुपये 1,28,01,600 दंडाची नोटीस 27/12/2023 रोजी पाठवली होती. अद्याप बांधकाम व्यावसायिकाने तो दंड मनपा कोषागारात भरलेला नाही.
पुणे मनपाने व्यावसायिकास पुन्हा एकदा नोटीस देऊन दंड व्याजासहित वसूल करावा. अन्यथा या व्यावसायिकाच्या शहरात चालू असणाऱ्या इतर बांधकामांना ‘Work Stop’ नोटीस द्यावी.
या बांधकाम व्यावसायिकाची कृती ही मनपा स्ट्रेचिंग पाॅलिसी भंग करणारी आहे. या व्यावसायिकाने सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्यामुळे दंड वसुल करावा. अन्यथा आम्ही येत्या काही दिवसांत न्यायालयाचा मार्ग अवलंबवू, असा इशारा रयत विद्यार्थी परिषदेचे ऋषिकेश कानवटे यांनी दिला आहे.










