न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ मार्च २०२५) :- ‘आईला त्रास का देता’? याची विचारणा करण्यासाठी घरी गेलेल्या तरुणाला ‘तु येथुन निघुन जा, तुझी आई घाल’ अशी शिवीगाळ केली तरुणासह त्याच्या भावाला आणि त्याच्या आईला तिघांनी मारहाण केली.
आईचा मोबाईल फोन फोडुन नुकसान केले. काठी डोक्यात मारुन फिर्यादी तरुणाला जखमी केले. ही घटना (दि. ०२) गजानन कॉलनी, काळेवाडी येथे घडली.
याप्रकरणी विजय सुरवसे (वय १९) याने आरोपी १) प्रकाश सुर्यवंशी, २) सुयश सुर्यवंशी व ३) निखील पिसाळ (रा. काळेवाडी) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. त्यानुसार काळेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास पोउपनि मुजावर हे करीत आहेत.










