न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ मार्च २०२५) :- महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) सार्वजनिक बांधकाम विभागातील मुख्य अभियंता (स्थापत्य) अशोक भालकर यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या विनंतीवरून ही बदली करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्यादित (शिबिर कार्यालय, पुणे) या ठिकाणी रिक्त पदी त्यांची बदली करण्यात आली आहे. त्यांना नवीन बदली ठिकाणी रुजू होण्यासाठी त्वरित कार्यमुक्त करावे, असा आदेश पीएमआरडीए आयुक्त योगेश म्हसे यांना अवर सचिव द. व. खारके यांनी दिले आहेत.

















