न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ फेब्रु.) :- येथील डी.वाय.पाटील मेडिकल कॉलेज ॲंड हायटेक हॉस्पिटल आणि मिडवेस्ट चॅप्टर ऑफ़ न्युरोलॉजिकल सर्जन्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कार्यशाळेस मेंदू तज्ञांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला.
यावेळी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मेंदू व मणका तज्ञ प्रेमानंद ऱामाणी, डॉ सुशील पाटकर, डी वाय पाटील मेडिकल कॉलेजच्या मेंदू व मणका रोग विभागप्रमुख डॉ. दीपक रानडे आदी उपस्थित होते.
डॉ रानडे यांनी मणक्यावरील गुंतागुंतीची शस्त्रक्रियेचे प्रात्यक्षिके करून दाखवले. वैद्यकीय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. रानडे म्हणाले की, क्यूसा, नयूरोनॅविगेशन, स्टिरीओटटॅक्टिक सर्जरी, डीप ब्रेन स्टिम्युलेशन, गामा नाइफ, अवेक ब्रेन सर्जरी, अशा विविध आधुनिक सुविधा नयूरोसर्जरी या क्षेत्रात आल्यामुळे शस्त्रक्रिया आणि उपचार करण्यामध्ये खूप उत्क्रांती होत आहे.
डॉ. रामाणी आणि डॉ. पाटकर यांनी देखील ना कॅडॅवर मणक्याच्या शस्त्रक्रियेत पेडिकल स्क्रू घालण्याचे प्रात्यक्षिके करून दाखवले. या कार्यशाळेत २०० मेंदुतज्ञ सहभागी झाले होते.