न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ मे २०१९) :- सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर ज्युनिअर कॉलेजने निकालाची परंपरा कायम राखली असून, बारावी विज्ञान आणि कॉमर्स शाखेचा बारावी परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
वाणिज्य शाखेत वैभवी पिल्ले ८२.७६ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. हर्षदा जठार हिने ८१.०७ टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक, तर दर्शना पाटील हिने ७५.२३ टक्के मिळवत तृतीय क्रमांक पटकावला. विज्ञान शाखेत परिधा तळमळे हिने ८४.६१ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. सेजल झांबरे ८१.०७ टक्के गुण पटकावत द्वितीय क्रमांक, तर साक्षी गव्हाणे हिने ७९.०८ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला. निकिता राजपुरोहित हिने ७०.१० टक्के गुण मिळवत चौथा क्रमांक पटकावला.

यशस्वी विद्यार्थिनींचे सोसायटीच्या अध्यक्षा आरती राव, उपाध्यक्ष प्रणव राव, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे, तेजल कोळसे पाटील यांनी अभिनंदन केले.











