- भंडाऱ्यातील टीमचा जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक; ३५० चित्रपटांतून ठरला वेगळा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. १७ सप्टेंबर २०२५) :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट व सांस्कृतिक विभागातर्फे आयोजित राज्यस्तरीय शॉर्टफिल्म फेस्टिव्हलमध्ये भंडाऱ्याच्या “शोकेस” या लघुपटाने द्वितीय क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे हा संपूर्ण लघुपट आयफोन १३ वर चित्रीत करण्यात आला होता.
“स्त्री” या विषयावर आधारित या चित्रपटात सागर धायगुडे व भूषण कांबळे यांनी दिग्दर्शन व छायांकन केले असून, मिहिका, मानसी आणि किशोर जोशी यांसह बालकलाकारांनी प्रभावी भूमिका साकारल्या. हृतिक म्हस्के यांनी संकलनाची जबाबदारी सांभाळली.
३५० चित्रपटांच्या शर्यतीत “शोकेस”ने स्त्रीच्या निर्णयस्वातंत्र्य आणि महिला क्रिकेटवरील उपेक्षेला केंद्रस्थानी ठेवत प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडले. मकरंद अनासपुरे, अरुण नलावडे आदी दिग्गजांकडून पारितोषिक मिळाल्याने संपूर्ण टीमने याला सामूहिक यश मानले. आयोजक बाबासाहेब पाटील आणि सहकाऱ्यांचे आभार मानत, ही केवळ सुरुवात असल्याचे दिग्दर्शक भूषण कांबळे यांनी सांगितले.
















