न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ जून २०१९) :- नुकत्याच झालेल्या बारावीच्या परीक्षेत वानवडीतील रोझरी स्कूल ऑफ ज्युनिअर कॉलेजच्या आदिती धनाजी मोझर हीने विशेष प्राविण्य मिळवीले आहे.
तिला बारावीच्या वाणिज्य शाखेत एकूण ९० % गुण मिळाले आहेत. तिला पुढे सनदी लेखापाल (C. A.) व्हायचे आहे. त्यासाठी तिने तयारीदेखील सुरु केली आहे. भोसरीतील अण्णासाहेब मगर सहकारी बँकेचे व्यवस्थापक धनाजी मोझर यांची आदिती ही कन्या आहे.